जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा - अमोल कोल्हे
Admin

जयंत पाटील यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा - अमोल कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर त्यांनी स्पष्ट देखिल केलं की, मी राष्ट्रवादीसोबतच राहणार आहे. मात्र, एका मुलाखतीत दादांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केली आणि पुन्हा या चर्चा रंगू लागल्या.

त्यानंतर आता सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना अमोल कोल्हे यांनी एक विधान केलं आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, 'जयंत पाटील यांच्यासारख्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेत्याची राज्याला मुख्यमंत्री म्हणून गरज आहे. ते आदर्श मुख्यमंत्री ठरतील. असे अमोल कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चां सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com