पवार साहेबांनी आज सगळ्या गोष्टींचे 
दूध का दूध पाणी का पाणी केलं - अमोल कोल्हे

पवार साहेबांनी आज सगळ्या गोष्टींचे दूध का दूध पाणी का पाणी केलं - अमोल कोल्हे

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अमोल धर्माधिकारी, पुणे

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे २०२४ ला शिरूर लोकसभा मतदार संघासाठी अमोल कोल्हेच असणार उमेदवार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. अमोल कोल्हे यांना कामाला लागण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, मी याआधीही सांगितलं होतं की याबाबत योग्य वेळी खुलासा होईल. पवार साहेबांनी आज या सगळ्या गोष्टींचा दूध का दूध पाणी का पाणी केलं आहे. मी सर्व आमदार, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभारी आहे.

तसेच माझी भाजपमधल्या कोणत्याही नेत्यांशी बैठक झालेली नव्हती. मी एक राजकीय व्यक्तीबरोबरच कलाकारही आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सोबत माझे भेटणे असते. पण विनाकारण चर्चा सुरू होत्या त्यांना मात्र आता ब्रेक लागलाय. 2019 पेक्षा 2024 ला माझ्याकडे जास्त वेळ. असे अमोल कोल्हे म्हणाले.

पवार साहेबांनी आज सगळ्या गोष्टींचे 
दूध का दूध पाणी का पाणी केलं - अमोल कोल्हे
लोकसभेसाठी शिरूरमधून अमोल कोल्हेंवरच शिक्कामोर्तब?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com