ताज्या बातम्या
Amol Kolhe | "संभाजी मालिकेच्या शेवटच्या वेळी माझ्यावर दबाव होता" अमोल कोल्हे यांचा खळबळजनक खुलासा
अमोल कोल्हे यांनी 'संभाजी' मालिकेच्या शेवटच्या भागावेळी माझ्यावर दबाव होता असा खळबळजनक खुलासा केला आहे. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याबाबत लवकरच सविस्तर बोलणार.
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या शेवटच्या भागावेळी माझ्यावर दबाव होता असा खळबळजनक खुलासा खासदार अमोल कोल्हे यांनी केलाय. मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याबाबत माझ्यावर दबाव होता, लवकरच याबाबत सविस्तर बोलणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.