भाजपाकडून काही ऑफर? यावर उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले आधी ऑफर तर यायला हवी, सध्या ऑफर एकच...
Admin

भाजपाकडून काही ऑफर? यावर उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले आधी ऑफर तर यायला हवी, सध्या ऑफर एकच...

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग साताऱ्यात होणार आहे.

'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचा प्रयोग साताऱ्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील कराड इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, लोकसभेत तुम्ही केलेल्या एका भाषणाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसमोर कौतुक केलं. तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीकडून काही ऑफर आहे का? असा प्रश्न अमोल कोल्हे यांना माध्यमांनी विचारला.

यावर उत्तर देताना अमोल कोल्हे म्हणाले की, माननीय पंतप्रधानांनी कौतुक केलं ही आनंदाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.तुम्ही एका पेपरमध्ये काम करत असताना, तुमच्या बातमीचं दुसऱ्या पेपरच्या संपादकांनी कौतुक केलं तर मी तुम्हाला विचारायचं का की तुम्ही नोकरी सोडताय? आधी ऑफर तर यायला हवी. सध्या ऑफर एकच आहे, 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य बघायला या. असे अमोल कोल्हे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com