Amol Mitkari : "इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय?"
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता दिशा सालियन प्रकरणाची पुन्हा चौकशी करा असं म्हणत दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची एनआयए चौकशी करावी, अशी मागणी करणारी याचिका सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.
दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास समीर वानखेडेंसारख्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणी सतीश सालियन यांनी केली असून याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलीसांवर गंभीर आरोप केला असून किशोरी पेडणेकरांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप देखील दिशाच्या वडिलांनी केला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "गेल्या दोन अडीच वर्षापासून या प्रकरणाची चर्चा होत होती. काल त्यांच्या वडीलांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन अनेकांवर गंभीर आरोप केलेत. प्रश्न असा आहे की, इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचं नेमका उद्देश काय? त्याला अडीच वर्षांचा कार्यकाळ लोटला. दोन तीन दिवसांपासून सुरु असलेला औरंगजेब विषय त्यावर महाराष्ट्राची चर्चा भरकटली आणि काल रात्रीपासून सुरु झालेलं दिशा सालियनचा विषय. मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनीसुद्धा जास्त हवा देऊ नये. तो न्यायालयीन प्रक्रियेचा एक भाग आहे." असे अमोल मिटकरी म्हणाले.