प्रशांत कोरटकर दुबईला पळाला? अमोल मिटकरी ट्विट करत म्हणाले...
प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रशांत कोरटकर याचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोध घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत त्याचा एक फोटो व्हायरल होत असून कोरटकर कोलकातामार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत कोरटकर याने काही दिवसांपूर्वी आपल्या वकिलांद्वारे मुंबई हायकोर्टात अटक पूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने प्रशांत कोरटकर याला अटकपूर्व जामीन द्यायला नकार दिला होता.
याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'कोरटकर दुबईत पळून गेल्याची माहिती समोर. पाताळात जरी गेला तरी याला शोधून आणणे सरकार समोरचे आता मोठे आव्हान ठरले आहे. नागपूर वरून थेट दुबई गाठण्याकरिता कोरटकरने दंगलीचा आधार घेऊन पळ काढल्याचे एकंदरीत दिसते. गृह खात्याने त्याला तात्काळ मुसक्या आवळुन भारतात आणावे.'