Amol Mitkari : संजय राऊत यांची पुरस्कार सोहळ्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका, अमोल मिटकरी म्हणाले...

Amol Mitkari : संजय राऊत यांची पुरस्कार सोहळ्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका, अमोल मिटकरी म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर आले होते.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला. शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

यावरुन संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी म्हणाले की, एकनाथरावजी शिंदे साहेबांना जो पुरस्कार दिला महादजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार होता. पुरस्कार कोणी द्यायचा आणि कोणी स्विकारायचा हा ज्यांच्या त्यांचा प्रश्न आहे. संजय राऊतांना अद्याप पुरस्कार मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात खंत असेल म्हणून ते बोलले.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, इतकं वर्ष महाविकास आघाडीमध्ये असतानासुद्धा जर त्यांना पवार साहेबांचे वैचारिक आणि राजकीय प्रगल्बता कळली नसेल तर त्यांच्यासारखा कोणी करंटा असूच शकत नाही असे अमोल मिटकरी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com