Chandrashekhar Bawankule : बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे; हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही, अत्यंत संवेदनशील विषय आहे
अमरावतीत भाजपचं प्रत्युत्तर आंदोलन आहे. महाविकास आघाडीच्या मूक मोर्चाला जाणीव जागरने आंदोलनाने उत्तर देणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, बदलापूरची घटना अत्यंत दुदैवी आहे. समाज मन दुखावणारी आहे. संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदलापूरच्या घटनेतील जो परिवार आहे त्याच्यासोबत आहे. आमच्या सर्वांच्या संवेदना कुटुंबियांसोबत आहे. महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये. याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जाणिवेचा यातून संपूर्ण समाजातून जनजागृती करु. अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे. अशी भूमिका आमची आहे.
मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही. अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे आम्ही सर्व सरकारकडे ही मागणी करतो आहे. की लवकरात लवकर सर्व सरकारने आपलं अधिकार वापरुन या घटनेमध्ये दोषी असणाऱ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अत्यंत तातडीने झाली पाहिजे. आमची पक्ष म्हणून जबाबदारी आहे आणि निश्चितपणे जे जे काही पक्ष म्हणून आम्हाला करायचं आहे ते करु. या घटनेला आम्ही शेवटपर्यंत याच्या मागे लागू. आरोपीला शासन झालं पाहिजे याकरत आम्ही काम करणार आहोत.
यासोबतच ते म्हणाले की, पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांचे राजकारण लखलाभ आहे. अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये. राजकारण करण्याकरता खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे. ज्या कुटुंबाला आपण न्याय देण्याकरता बोलतो आहे. त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे. इतक्या घटना महाराष्ट्रामध्ये त्यांच्याही काळामध्ये घडल्या. पण आम्ही सर्वांनी त्या काळात सरकार म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहिलो. आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो. अशा गंभीर घटनामध्ये पाठिशी उभं राहिलो. असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.