नवनीत राणा माझ्याबद्दल बोलल्या ते सर्व खोटं मला कोणीही पळवून नेलं नाही - तरुणीची प्रतिक्रिया

नवनीत राणा माझ्याबद्दल बोलल्या ते सर्व खोटं मला कोणीही पळवून नेलं नाही - तरुणीची प्रतिक्रिया

लव जिहाद वळण देणाऱ्या त्या प्रकरणाला धक्कादायक वळण

सूरज दहाट, अमरावती

अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्या अंतर्गत एका १९वर्षीय युवतीचं अपहरण करून तिचा या प्रकरणी लव जिहादचा समधं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व भाजप खासदार अनिल बोंडे,भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी जोडला होता. मात्र परवा रात्री सदर तरुणी सातारा येथे सापडली होती तर अमरावती पोलीस सातारा वरून तिला अमरावतीला आज 3 वाजता पहाटे घेऊन आले दरम्यान त्या तरुणीने मला कोणीही पळवुन नेलं नाही मी बाहेर शिक्षणासाठी जात होते. नवनीत राणा बोलत आहे ते पूर्ण खोट आहे असा धक्कादायक खुलासा पीडित तरुणीने माध्यमांशी बोलतांना केला,त्यामुळे विविध आरोप करणारे भाजप नेते व राणा दाम्पत्य या प्रकरणात तोंडघशी पडले आहे

आमच्या हिंदूंच्या मुली मुस्लिम युवक पळून नेतात लव जिहादचे हे प्रकरन आहे व माझा कॉल रेकॉर्ड केला यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात मोठा राडा घातलेला होता व पोलिसांशी हुज्जत घालत वाद घातला व पोलिसावर राणा दापत्यांनी गंभीर आरोप केले, मात्र चार दिवसानंतर पहाटे तरुणी अमरावतीत पोहोचली तिने राजापेठ पोलीस ठाण्यात आपलं सविस्तर बयान दिलं, त्या नंतर तिला पोलिसांनी नातेवाईकांना स्वाधीन केलं,

यावेळी तिने प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी तिने माझी बदनामी थांबवा, मला कोणिही पळवुन नेलं नाही, नाही मी स्वतः घरून गेले, माझी खूप बदनामी होत आहे नवनीत राणा ज्या बोलत आहे ते पूर्णपणे खोट आहे अशी धक्कादायक प्रतिक्रिया युवतीने दिले,दरम्यान अमरावती जिल्हासह संपूर्ण महाराष्ट्रात लव जिहादच वळणं या प्रकरणात देण्यात आल्यामुळे व आता तरुणीने पूर्णपणे खुलासा केल्यानंतर राजकीय पुढारी मात्र तोंडघशी पडले आहे

Lokshahi
www.lokshahi.com