तरुणाची हत्या करून अपघाताचा बनाव; दर्यापूर तालुक्यातील घटना, पाच जण पोलिसांच्या ताब्यात

तरुणाची हत्या करून अपघाताचा बनाव; दर्यापूर तालुक्यातील घटना, पाच जण पोलिसांच्या ताब्यात

पाच जण पोलिसांच्या ताब्यात
Published on

सूरज दहाट, अमरावती

अमरावती जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. दर्यापूर तालुक्यातील धामोरी येथील बस स्टॉपवर हॉटेल मधल्या काम करणाऱ्या युवकाची हत्या करण्यात आली. तरुणाचा खून करण्यात आला आणि अपघात झाल्याचा बनाव करण्यात आला. मात्र पोलिसांनी सगळं उघडकीस आणलं.

या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोक्यावर धारधार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या करण्यात आली आणि रस्त्यावर मृतदेह टाकून अपघात झाल्याचा देखावा करण्यात आला होता मात्र पोलिसांनी सगळा प्रकार उघडकीस आणला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com