Amruta Fadnavis
Amruta FadnavisTeam Lokshahi

अमृता फडणवीसांचा जलवा! नव्या गाण्याला काही तासांतच लाखो व्हयूज

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या अनेकदा सामाजिक विषयांवर आपले मत मांडताना दिसतात.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या अनेकदा सामाजिक विषयांवर आपले मत मांडताना दिसतात. व्यवसायाने बॅंकर असलेल्या अमृता यांना गाण्यांची विशेष आवड आहे. नुकतंच अमृता फडणवीस यांचे 'मूड बना लिया हे' नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे.

अमृता फडणवीसांचं 'मूड बना लिया हे' हे गाणं टी सीरिजच्या युट्यूबवर आज प्रदर्शित करण्यात आलं आहे. अवघ्या काही तासांतच या गाण्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्यात अमृता यांचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. अमृता यांनी हे गाणं गाण्याबरोबरच डान्सही केला आहे. अमृता फडणवीसांच हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

काही दिवसांपूर्वीच अमृता यांनी त्यांच्या या गाण्याची घोषणा सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर या गाण्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला होता. टीझरमध्ये अमृता यांच्या डान्सची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली होती. तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये अमृता यांच्या नव्या गाण्याबाबत उत्सुकता वाढली होती. अमृता यांनी याआधीही अनेक गाण्यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘वो तेरे प्यार का गम’, ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’ या त्यांच्या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.

Amruta Fadnavis
महाराष्ट्रात नंगा नाच चालू देणार नाही : चित्रा वाघ
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com