Apple
AppleTeam Lokshahi

"दिवसाला एक सफरचंद डॉक्टरांना ठेवतो दूर "

सफरचंद हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. सफरचंदाचे अनेक फायदे आहेत "दिवसाला एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवतो" ही जुनी म्हण तुम्ही ऐकली असेलच. सफरचंदाचं सेवन करणं आरोग्यासाठी चांगल असतं.
Published by :
Team Lokshahi

सफरचंद हे सर्वात लोकप्रिय फळांपैकी एक आहे. सफरचंदाचे अनेक फायदे आहेत "दिवसाला एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवतो" ही जुनी म्हण तुम्ही ऐकली असेलच. सफरचंदाचं सेवन करणं आरोग्यासाठी चांगल असतं.

दररोज एक सफरचंद खाल्याने शरीर निरोगी राहतं. जर तुम्ही सफरचंद खाण्यापूर्वी त्याची साल काढून खात असाल तर तुम्हाला जास्त फायबर किंवा त्यातील पोषन पुर्णपणे मिळणार नाही. त्यात असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यात मदत होते. फायबर समृध्द अन्न खाल्ल्याने शरीरातील रक्ताच प्रमाण वाढण्यात मदत होते. दररोज एक सफरचंद खाल्याने कॅान्स्टीपेशन आणि डाइरीया सारख्या आजारांवर मात करता येऊ शकते. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की वनस्पती रसायने आणि सफरचंदाच्या सालीचे फायबर रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या नुकसानापासून संरक्षण करतात. ते कोलेस्टेरॉल कमी करण्यात देखील मदत करू शकतात,सफरचंद काही प्रमाणात कर्करोगा सारख्या आजारावर सुद्धा गुणकारी ठरतात.

Apple
AppleTeam Lokshahi

सफरचंद खाल्याने हे फायदे होतात ;-

  • वजन कमी होण्यात मदत होते

  • हाडाना मजबूत ठेवत

  • अस्थमा सारख्या आजारावर गुणकारीक ठरतं

  • हृदय निरोगी राहतं

  • रोगप्रतीकारक शक्ती वाढवण्यात मदत होते.

Apple
Deepak Kesarkar : राऊतांवर कारवाई व्हावी अशी आमची इच्छा नाही

सफरचंदात असलेल्या साखरेबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आपल्या शरीरातील साखरेवर परिणाम करणारे कार्बोहायड्रेट असले तरी, हे कार्ब इतर शर्करांपेक्षा वेगळे आहेत. ते शरीरातील साखरेच प्रमाण बॅलेन्स ठेवतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com