Fallen Arch in Kalyan
Fallen Arch in KalyanTeam Lokshahi

कल्याणमध्ये रस्त्यावरील कमानी आणि बॅनरबाजीचा प्रश्न ऐरणीवर

एक कमान कोसळल्याने नागरीकांमध्ये खळबळ; कधी होणार कारवाई?
Published by :
Vikrant Shinde

अमजद खान | कल्याण: शहरभरात रस्त्यावर होर्डिंग आणि कमानी लावण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या लक्ष नसल्याने या कमानी जिवघेण्या ठरल्या आहेत. कल्याण पूर्व भागातील मलंग रोडवरील रस्त्यावर लावण्यात आलेली कमान अचानक एका रिक्षावर पडली. या घटनेतून रिक्षा चालक सुदैवाने बचावला आहे. प्रशासनाने या होर्डिंग आणि कमानीवर कारवाई केली पाहिजे. अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Fallen Arch in Kalyan
"...तर महाविकास आघाडीला एकही उमेदवार सापडणार नाही" चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

सणासुदीच्या काळात राजकीय पक्षाकडून तसेच समाजिक कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी आणि रस्त्याच्या मधोमध कमानी लावल्या जातात. आता या बॅनर आणि कमानी प्रशासनासाठी डोकेदुखी आणि नागरीकांसाठी जीवघेण्या ठरत आहेत. कल्याण पूर्व भागातील मलंग रोडवर लावण्यात आलेली एक कमान अचानक कोसळली. ही कमान रिक्षावर पडल्यानं रिक्षाचे नुकसान झालं आहे.

दरम्यान, महापालिका हद्दीत बेकायदा होर्डिंग लावण्यात येत आहेत. या बेकायदा होर्डिगमुळे महापालिकेचे नुकसान होत आहे. बेकायदा होर्डिगवर काय कारवाई केली याची विचारणा प्रशासनाकडे माहिती अधिकाराचे कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी केली होती. ही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही. या प्रकरणी ते उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती तिवारी यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com