Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Team Lokshahi

"...तर महाविकास आघाडीला एकही उमेदवार सापडणार नाही" चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

आगामी काळात बारामतीला झटका बसेल असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केला.
Published by :
Vikrant Shinde

सूरज दाहाट | अमरावती: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीत दौऱ्यावर आहेत, "आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे 18 - 18 तास सलग काम करतात, तर अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये जे वंचित झाले ते सर्व लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहे, भाजपमध्ये बॉम्ब ब्लास्ट होतील असे प्रवेश होईल तर महाविकास आघाडीला आगामी २०२४च्या निवडणुकीत एकही उमेदवार मिळणार नाही त्यांनी फक्त 2024 ची वाट बघावी" असं मोठं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं, अमरावतीत मागील वर्षी भाजपने रॅली काढली होती त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते या प्रकरणात आज जिल्हा व सत्र न्यायालयात बावनकुळे यांनी हजेरी लावली.

Chandrashekhar Bawankule
"अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेना सत्ता स्थापनेची विनंती केली होती" अब्दूल सत्तार यांचा खळबळजनक दावा

बारामती वरूनच राष्ट्रवादीची घड्याळ बंद पाडू:

"राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांना आजही शरद पवारांचा आधार घ्यावा लागतो, त्या शरद पवार यांच्या नावावर कितीदा निवडून येतील आता फक्त मोदींच्या नावावरच लोक निवडून येणार व मोदींच्या नावावरच सरकार येतील, तर आता बारामती मधूनच राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडू" असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

"फक्त बारामती शहराचा विकास झाला आहे, बारामती मतदारसंघात पाच मतदारसंघ येतात ते मतदारसंघ विकासापासून आजही वंचित आहे,तर पवार कुटुंबाच्या पायाखालची वाळू घसरली आहे आता तर हे शतक एकविसावं शतक आहे, त्यामुळे आगामी काळात बारामतीला झटका बसेल" असा दावाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com