Abdul Sattar
Abdul Sattar Team Lokshahi

"अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेना सत्ता स्थापनेची विनंती केली होती" अब्दूल सत्तार यांचा खळबळजनक दावा

अशोक चव्हाणांच्या विधानावर अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया
Published by :
Vikrant Shinde

रवी जयस्वाल | जालना: काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. त्याचय आज जालना येथे राज्याचे कृषीमंत्री व शिंदेगटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी आणखी एक दावा केला आहे. जालन्यामध्ये बोलताना सत्तारांनी "त्यावेळी, अशोक चव्हाणांसोबत आम्हीच एकनाथ शिंदेना सत्ता स्थापनेची विनंती केली होती" असा दावा केला आहे.

Abdul Sattar
राज ठाकरे दसरा मेळाव्याच्या वादापासून दूरच; दसऱ्यादिवशी असणार पुण्यात

नेमकं काय म्हणाले सत्तार?

"मी स्वत: त्यावेळी काँग्रेसमध्ये होतो...आम्हीच एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्ता स्थापनेची विनंती घेवून गेलो होतो" असं सत्तार यांनी म्हंटलंय. त्याचबरोबर, "चंद्रकांतं खैरे यांना गणिताची टोटलच कळत नाही" असं म्हणत सत्तार यांनी खैरेंवर टीका केलीये.

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मानावं आणि जुळवून घ्यावं:

जालन्यात बोलताना सत्तारांनी "उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचं नेतृत्व मान्य करावं आणि जुळवून घ्यावं अन्यथा उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल" असं वक्तव्य केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com