अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक

अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक

अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

महाराष्ट्राचे अधिवेशन सुरु आहे. अर्थमंत्री अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अंतरिम अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार कोणत्या मोठ्या घोषणा करणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.आठवड्यात सलग दुसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com