Pune News : प्रेमीयुगुलांना कोणी आवरणार का?; पुण्यातील खराडीत धावत्या थारवर चढून रोमान्स
Pune Couple Romance On Running Bike : पुण्यातील खराडी परिसरात वाहतूक नियमांना धाब्यावर बसवणारी एक घटना उघड झाली आहे. एका प्रेमी युगुलाने धावत्या कारच्या छतावर बसून रोमँटिक पोज देत स्टंटबाजी केली. हा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या नजरेत आला आणि त्याचा व्हिडिओ थेट सोशल मीडियावर पोहोचला. काही तासांतच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये दिसते की, कार भरधाव वेगाने चालू असताना एक तरुण आणि तरुणी रूफटॉपवर बसलेले आहेत. दोघेही एकमेकांच्या जवळ येऊन रोमँटिक हावभाव करताना दिसत आहेत. या बेफिकीर कृतीदरम्यान, वाहनाचा वेग आणि रस्त्यावरची वाहतूक लक्षात घेता अपघाताची शक्यता टाळता आली असती का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नागरिक आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, यामुळे तरुण पिढीवर चुकीचा परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे. वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन करून जीव धोक्यात घालणाऱ्या या युगुलाविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.
खराडी परिसरात यापूर्वीही अशा स्टंटबाजी आणि गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या असून, पोलिसांनी अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.