Bharat Jodo Yatra : गौरव डोंगरे पाटील यांना थेट राहुल गांधींसोबत संवाद साधण्याची संधी
आदेश वाकळे : संगमनेर | वाढती महागाई, बेरोजगारी, देशाला दोन घटकात विभागण्याचा प्रयत्न करणाऱ्या जुमलेबाज केंद्र सरकारच्या विरोधात नफरत छोडो, भारत जोडोचा नारा देत राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर पदयात्रा सुरु केली असून दक्षिण भारतातील सर्वच राज्यात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्या नंतर महाराष्ट्राच्या पवित्र आणि रांगड्या भूमीत त्यांचं लाखोंच्या संख्येने स्वागत करण्यात आलं, मराठवाडा व विदर्भामागे मध्यप्रदेशाकडे जाणाऱ्या ह्या यात्रेत काँग्रेस विधिमंडळ गटनेते माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून विशेष ओळख असलेले युवा नेते सत्यजित दादा तांबे यांनी संगमनेर सह नगर जिल्ह्यातील सर्वच तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी यांना सहभागी करून घेतले आहे.
दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात भारत जोडो यात्रा पोहचली असता पठार भागाचे उदयोन्मुख नेतृत्व विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौरवभाऊ डोंगरे यांना थेट राहुलजी गांधी यांच्या सोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. गौरव डोंगरे हे सत्यजित तांबे यांच्या विद्यार्थी काँग्रेस, युवक काँग्रेस टीमचे शिलेदार म्हणून ओळखले जातात. तालुक्यात विद्यार्थी आंदोलन, जन आंदोलनात त्यांचा असणारा विशेष सहभाग तसेच बाळासाहेबजी थोरात यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून पठार भागात कमी वयात पण मोठ्या सक्रिय स्वरूपात त्यांचे असणारे सामाजिक व राजकीय योगदान हे नेहमीच चर्चेत असते. गेले तीन दिवस यात्रेत पायी चालून काँग्रेस पक्षाच्या मार्फत देशाला नवी दिशा देण्यासाठी तयार झालेल्या वातावरणाचा घटक होण्याची संधी मिळाली आणि ही संधी केवळ आमदार बाळासाहेब थोरात, सत्यजित दादा तांबे यांच्यामुळे मिळाली असे गौरव डोंगरे यांनी सांगितले. विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून "फर्स्ट व्होटर प्रोग्राम" राबवण्याची त्यांची संकल्पना त्यांनी राहुलजी गांधी यांना सांगताच त्यांनी ईमेल द्वारे ती संकल्पना शेअर करण्याला प्रतिसाद दिला. काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणामुळे ग्रामीण भागाचा आजवर चेहरा मोहरा बदलला असून स्मार्ट सिटी प्रमाणे पठार भागात स्मार्ट व्हिलेज झाले पाहिजे हे ध्येय उराशी बाळगणाऱ्या गौरव यांनी युवा नेते सत्यजित दादा तांबे यांच्या सारख्या क्रियाशील आणि सक्षम नेतृत्वाचा काँग्रेस पक्षाला नेहमीच फायदा होत असून त्यांना अधिक वरची जबाबदारी मिळावी अशी देखिल मागणी गौरव डोंगरे यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखिल समवेत उपस्थित होते. भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना तसेच लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणाऱ्या राष्ट्रवादी व शिवसेने सारख्या सहयोगी घटक पक्षाचे देखिल गौरव डोंगरे यांनी एक सामान्य काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आभार मानले आहेत.