ताज्या बातम्या
Shirdi Sai Baba Mandir : अज्ञात व्यक्तीने दिली साई मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी; गुन्हा दाखल
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे.
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डीतील साईबाबा मंदिर (Shirdi Sai Baba Mandir) बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली आहे. साईबाबा मंदिरला पाईप बॉम्बने (Bomb) उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. अज्ञात आरोपीने ईमेलद्वारे साईबाबा संस्थानला दिली. अज्ञात आरोपीविरोधात भा. न्या. सं . कलम ३५१ (४) प्रमाणे शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.