Anant Ambani Radhika Merchant Engagement
Anant Ambani Radhika Merchant EngagementTeam Lokshahi

Anant Ambani Radhika Merchant Engagement: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा, पहिला फोटो समोर

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची एंगेजमेंट झाली.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांची एंगेजमेंट झाली. अंबानी कुटुंबाने त्यांच्या घरी, अँटिलिया येथे मोठ्या थाटामाटात हा साखरपुडा पार पडला. आता या एंगेजमेंटचे फोटो समोर आले आहेत ज्यात अनंत आणि राधिका त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत दिसत होते. विशेष म्हणजे अनंत आणि राधिकाचा रोका सोहळा काही दिवसांपूर्वी झाला होता. ज्यांच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्यामध्ये राधिका गुलाबी रंगाचा लेहेंगा घालून आलिया भट्टच्या 'घर मोर परदेसिया' गाण्यावर डान्स करताना दिसली होती.

एंगेजमेंट दिवशी राधिका मिर्चेटने गोल्डन आणि क्रीम कलरचा लेहेंगा चोली घातली आहे. गळ्यात डायमंड सेट आणि हातात हिऱ्याचे ब्रेसलेट आणि मांग टिका त्यांच्यावर खूप छान दिसत आहे.

त्याचवेळी अनंत अंबानी निळ्या रंगाच्या शेरवानीमध्ये दिसले. दोघांनी एकत्र आणि कुटुंबासोबत पोजही दिल्या.

नीता अंबानी गोल्डन आणि क्रीम कॉम्बिनेशनची लाल बॉर्डर साडी परिधान करताना दिसल्या, तर मोठी सून श्लोका फिकट निळ्या रंगाच्या लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती.

एंगेजमेंटनंतर अंबानी कुटुंबाने एकत्र फोटो काढले ज्यात सर्वजण खूप आनंदी दिसत होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com