Anant Geete : विश्वासघातकी माणसाला तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार का?

Anant Geete : विश्वासघातकी माणसाला तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार का?

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता रायगड लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांनी महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

महाविकास आघाडीचे अनंत गीते म्हणाले की, मागच्याच निवडणुकीत या सुनील तटकरे यांना या रायगडच्या राजकारणातून मी हद्दपार करणार होतो. 100 टक्के हद्दपार करणार होतो. पण त्यांची हद्दपारी शेकाप पक्षाच्या जयंत पाटील यांनी वाचवली. हे हद्दपारी वाचवण्याचे पाप जयंत पाटील यांनी केलं. म्हणून त्यांनी जयंत पाटीय यांच्या पाठित खंजीर खुपसला.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, त्यानंतर ज्या शरद पवार साहेबांनी मोठं केलं त्या शरद पवार साहेबांच्या पाठितसुद्धा खंजीर खुपसला. अशा विश्वासघातक्याला तुम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करणार का? असा सवाल अनंत गिते यांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com