Virat Kohli
Virat Kohli

टी-२० वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची निवड होणार का? RCB चा प्रशिक्षक म्हणाला, "निवड समिती..."

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरोधात शतकी खेळी केली.
Published by :
Naresh Shende
Published on

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा माजी कर्णधार विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरोधात शतकी खेळी केली. विराटच्या या शतकी खेळीनंतर आरसीबीचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवरला कोहलीबाबत मोठा प्रश्न विचारण्यात आला. टी-२० वर्ल्डकप टीममध्ये विराट कोहलीची निवड झाली पाहिजे का? या प्रश्नाचं उत्तर देनात अँडी म्हणाले, विराट कोहली जबरदस्त फलंदाज आहे. पण मी भारतीय संघाच्या निवड समितीविषयी काहीच बोलणार नाही.

अँडी फ्लॉवर माध्यमांशी बोलताना म्हणाला, विराट कोहली खूप जबरदस्त खेळाडू आहे. त्याने राजस्थान रॉयल्सविरोधात क्लासिकल खेळी केली. त्याची फलंदाजी पाहून खूप चांगलं वाटलं. भारतीय संघाच्या निवड समितीबाबत मला काहीच बोलायचं नाहीय. सिलेक्टर्स काय विचार करत आहेत, याबाबत मला माहिती नाही. त्याच्याकडे खूप जास्त कौशल्य आहे. विराट कोहली त्याच्या गेममध्ये टॉपवर आहे.

विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरोधात झालेल्या सामन्यात ७२ चेंडूत १२ चौकार आणि ४ षटकार ठोकून ११३ धावांची नाबाद खेळी केली. विराटने शतक ठोकलं पण धीम्या गतीनं धावा केल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे. टी-२० फॉर्मेटच्या स्ट्राईक रेटने विराट फलंदाजी करत नाही, अशा चर्चाही रंगल्या होत्या. याच कारणामुळे टी-२० वर्ल्डकपमध्ये विराटची निवड होणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com