आंगणेवाडीमधील माळरानावर भाजपाची भव्य जाहीर सभा; करणार शक्तिप्रदर्शन

आंगणेवाडीमधील माळरानावर भाजपाची भव्य जाहीर सभा; करणार शक्तिप्रदर्शन

भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आंगणेवाडी यात्रेचा मुहूर्त साधत भाजपची जाहीर सभा घेणार आहेत. मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 4 फेब्रुवारीला होत आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.

मालवण तालुक्यातील मसुरे एक गाव आहे. या गावात आंगणेवाडी नावाची वाडी असून या वाडीत 'भराडी देवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी' असं ठेवण्यात आलं आहे. भराड म्हणजे माळरान. या देवीच्या आजूबाजूचा परिसर हा माळरान आहे म्हणूनच या देवीला भराडी देवी असं नाव पडलं. मसुरे गावच्या या आंगणेवाडीच्या या वाडीत केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ख्याती आहे.

याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय या टॅगलाईनवर ही सभा भाजपने आयोजित केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याने भाजपला ग्रामपंचायतीपासून सर्व निवडणुकांमध्ये भरभरुन दिले. आता भाजपचे सरकार राज्यात आलं असून त्यांनी रोजगार उपलब्ध करुन स्थानिकांना इथेच स्थिर होण्यासाठी संधी द्यावी असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com