सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय.. नव्या टॅगलाईमुळे सिंधुदुर्गात राजकीय धुरळा

सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय.. नव्या टॅगलाईमुळे सिंधुदुर्गात राजकीय धुरळा

भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

भराडी देवीच्या यात्रेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आंगणेवाडी यात्रेचा मुहूर्त साधत भाजपची जाहीर सभा घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय या टॅगलाईनवर ही सभा भाजपने आयोजित केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याने भाजपला ग्रामपंचायतीपासून सर्व निवडणुकांमध्ये भरभरुन दिले. आता भाजपचे सरकार राज्यात आलं असून त्यांनी रोजगार उपलब्ध करुन स्थानिकांना इथेच स्थिर होण्यासाठी संधी द्यावी असे ते म्हणाले.

मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा 4 फेब्रुवारीला होत आहे. दरवर्षी लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. आंगणेवाडीतल्या भराडी देवीच्या यात्रेला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होत असतात. त्यासोबतच विविध पक्षाचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com