राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 1 ऑक्टोबरला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा

राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 1 ऑक्टोबरला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा

अंगणवाडी सेविकांकडून 1 ऑक्टोबरला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
Published on

अंगणवाडी सेविकांकडून 1 ऑक्टोबरला राज्यभरात चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी 23 सप्टेंबरपासून आझाद मैदानात आंदोलन पुकारले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची 24 सप्टेंबरला दखल घेत महिला व बालविकास मंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा केली होती आणि तातडीने हा विषय मंत्रिमंडळात मांडू असे आश्वासन दिले होते मात्र आश्वासन पूर्ण न झाल्याने 26 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानामध्ये अंगणवाडी सेविकांकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे.

मंत्रिमंडळामध्ये मागण्या मान्य होऊन शासन आदेश काढण्यात येत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यासोबतच येत्या 1 ऑक्टोबर रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com