Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी आमच्या संपर्कात

Anil Deshmukh : अनिल देशमुखांचा मोठा गौप्यस्फोट; आमदार धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी आमच्या संपर्कात

अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Published on

अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख म्हणाले की, आमदार धर्मराव बाबा यांची मुलगी भाग्यश्री आमच्या संपर्कात आहे. ती म्हणते माझ्या वडिलांच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे. तीनदा ती साहेबांना भेटली.

तसेच ते पुढे म्हणाले की, तिचा आग्रह आहे. माझ्या बाबांनी जे तुमच्या बरोबर केलं, तुमच्या पक्षाबरोबर केलं ते मला आवडल नाही. मला तिकीट द्या, तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मी माझ्या वडिलांना पाडल्याशिवाय राहणार नाही. असं तिने सांगितले. असे अनिल देशमुख म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com