Amruta Fadnavis Blackmail Case :
बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; कोण आहे अनिल जयसिंघानी?
Admin

Amruta Fadnavis Blackmail Case : बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक; कोण आहे अनिल जयसिंघानी?

बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. आता अमृता फडणवीस ब्लॅकमेलिंग प्रकरणी अनिल जयसिंघानीला अटक करण्यात आली आहे. 7 वर्षांपासून अनिल हा फरार होता. राज्यातील पोलिसांना तो चकवा देत होता.

अमृता फडणवीसांनी अनिक्षा डिझायनर आणि तिच्या वडीलांविरूद्ध मुंबई पोलिसांत तक्रार दाखल होती.  त्यांच्या विरोधात १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. ती कपडे, दागिन्यांची डिझायनर आहे. तिने डिझाईन केलेले कपडे आणि दागिने सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी अनिक्षाने विनंती केली होती.  अमृता फडणवीस यांनी अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी विरोधात मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी अनिक्षा हिला अटक केली होती आणि आता अनिल जयसिंघानीला अटक केली आहे.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

अनिल जयसिंघांनी हा एक बुकी असल्याचा आरोप आहे.

त्याचावर 15 गुन्हे दाखल आहेत.

तसेच 7 वर्षांपासून तो फरार आहे.

सगळ्या राज्यातले पोलीस म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, आसाम हे पोलीस त्याचा मागावर होते.

त्याचा घरावर ईडीने 2015 साली धाड टाकली होती.

लोकांचे पैसे उकळण्याचे तसेच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणे असे देखिल त्याच्यावर आरोप आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com