Anil Parab
Anil ParabTeam Lokshahi

अनिल परब यांना साई रिसॉर्ट प्रकरणी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

परब यांना 14 नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

लक्ष्मीकांत घोणसेपाटील|रत्नागिरी: दापोली येथील मुरुड येथील साई रिसॉर्ट प्रकरणी आयपीसी 420 अन्वये गुन्हा दाखल झालेले माजी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांना खेड न्यायालयाचा दिलासा मिळाला आहे. परब यांना 14 नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर झाले असल्याने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत. दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी परब यांच्या विरोधात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.

मुरुड येथील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीच्या असून हे रिसॉर्ट बांधताना गैरमार्गाने आलेल्या पैशाचा वापर केला गेला होता. तसेच शासनाची दिशाभूल करून हे रिसॉर्ट बांधण्यात आले होते असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला असून हे रिसॉर्ट पाडावे यासाठी ते पाठपुरावा करत आहेत.

किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार सोमवारी रात्री दापोली पोलीस स्थानकात दापोलीचे गटविकास अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवरून अनिल परब आणि दोघे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा गुन्हा दाखल होताच परब यांचे वकील ऍड सुधीर बुटाला खेड न्यायालयासमोर अटकपूर्व जामीन साठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सुनावणीसाठी आला असता ऍड सुधीर बुटाला यांनी मांडलेली बाजू लक्षात घेऊन न्यायाधीशाने अनिल परब यांना 14 नोव्हेंबर पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. अनिल परब यांना याप्रकरणी अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com