मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी अनिल परब म्हणाले...

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी अनिल परब म्हणाले...

मुंबई पदवीधरसाठी अनिल परब आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबई पदवीधरसाठी अनिल परब आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनिल परब आज अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याआधी अनिल परब यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. अनिल परब म्हणाले की, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज पदवीधर मतदारसंघ मुंबई याचा उमेदवारी अर्ज भरत आहे.

यासोबतच ते म्हणाले की, शिवसैनिकांनी जी काही नोंदणी केलेली आहे. या नोंदणीच्या जोरावर प्रचंड मताधिक्याने विजयी होण्याचा मला विश्वास आहे. असं अनिल परब म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com