Baramati News : भयंकर! गावगुंडांना कंटाळून तिनं संपवलं आयुष्य; तिचा दहावी निकाल पाहून आईला अश्रू अनावर

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती.
Published by :
Rashmi Mane

बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील दहावीची परीक्षा दिलेल्या अंकिता कडाळे या शाळकरी मुलीने गावगुंडांना कंटाळून आत्महत्या केली होती. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला असून मृत अंकिता विद्यालयात पहिली आली आहे. अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते. मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती. अंकितचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अपूर्णच राहिले. उर्वरित आरोपींना अटक व्हावी, यासाठी तिचे पालक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची पायरी झिजवत आहेत. उर्वरीत आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल, असे तिच्या पालकांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com