Ankush Chaudhari : अंकुशने दिले चाहत्यांना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट
मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता अंकुश चौधरी आहे. अंकुश नेहमी नवीनवीन भूमिका घेऊन चाहत्यांच्या भेटीस आला आहे. अंकुश आजपर्यत दगडी चाळ, ती सध्या काय करते, चेकमेट, माझा नवरा तुझी बायको या चित्रपटांच्या माध्यामांतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सुरुवातीच्या काळात मेहनत, परिश्रमकरुन अभिनयाच्या जोरावर अंकुशने आपली एक वेगळी ओळख सिनेसृष्टीमध्ये निर्माण केली आहे. अंकुशच्या वाढदिवसाला चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला होता. त्याच शुभेच्छांचे रिटर्न गिफ्ट म्हणून अंकुशने आगामी चित्रपटाची पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
१३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ या चित्रपटातील कलाकारांची धमाल आणि ‘जपून जपून जा रे’ या गाण्याने तर अवघ्या प्रेक्षकांना वेड लावले होते. या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करण्याची मागणी प्रेक्षकांनी केली होती.
आता लवकरच सर्वांचा लाडका अभिनेता अंकुश चौधरी याने स्वतः ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ – कॉमेडी ऑफ टेरर्स’ ची सोशल मीडियावर घोषणा केली आहे. या पोस्टच्या खाली कॅप्शनमध्ये अंकुशने लिहिले की, मित्रपरिवार आणि साऱ्यांनीच माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छांसाठी सर्वांचे मनापासून आभार!!! गेली कित्येक वर्ष तुमच्याकडून मला मिळत असलेल्या या प्रेमाचं return gift म्हणून आज खास तुमच्यासाठी घेऊन येतोय एक नवीन सिनेमॅटिक भेट! आजपासूनच हे नाव लक्षात असू द्या!!! ‘नो एंट्री पुढे धोका आहे २ - कॉमेडी ऑफ टेरर्स’ लवकरच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!अंकुशने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे.
या पोस्टमध्ये अंकुश हा स्पिनर हातात घेऊन फिरवताना दिसत आहे, आणि त्याच्या दोन्ही बाजूला अर्धस्त्री आणि अर्धरोबोट या दिसत आहे. त्यामुळे पहिल्यादाच अर्धस्त्री आणि अर्धरोबोट असणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटामध्ये काय गंमत आहे हे पाहण औत्सुकतेचे ठरणार आहे. अंकुश चौधरी आता अभिनयाबरोबर दिग्दर्शनाकडे वळला आहे. झकास, साडे माडे तीन, नो एन्ट्री..पुढे धोका आहे, हे चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले आहे.