मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर ठग सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक लेटरबॉम्ब, आता पॉलिग्राफ चाचणीसाठी आव्हान

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर ठग सुकेश चंद्रशेखरचा आणखी एक लेटरबॉम्ब, आता पॉलिग्राफ चाचणीसाठी आव्हान

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ठग सुकेशचा आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्याविरोधात ठग सुकेशचा आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे. यामध्ये सुकेश चंद्रशेखर यांनी पॉलीग्राफ चाचणी करण्याचे आव्हान दिले असून सत्येंद्र जैन आणि केजरीवाल यांच्यावरील आरोपांबाबत माझी पॉलीग्राफ चाचणी करण्याच्या सूचनेचे मी स्वागत करतो, असे म्हटले आहे.

यासोबतच सुकेशने अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांना पॉलिग्राफ चाचणीचे आव्हानही दिले. त्यांनीही यासाठी संमती द्यावी आणि त्यानंतर तिघांचीही एकत्रित चाचणी करावी, असे सुकेशने सांगितले. या चाचणीचे थेट प्रक्षेपण व्हावे, जेणेकरून अरविंद केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांचे सत्य देशासमोर येऊ शकेल, असेही सुकेशने पत्रात म्हटले आहे.

सुकेश चंद्रशेखर याने दावा केला आहे की त्यांच्याबद्दल माहिती असल्याने, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट आणि टाईम्स मॅगझिनसारख्या वृत्तपत्रांमध्ये पीआर एजंटच्या माध्यमातून दिल्लीतील सरकारी शाळांच्या जाहिरातीसाठी पैसे देऊन पेड न्यूज प्रकाशित करण्यात आल्या. मार्क आणि वेरोनिका या वृत्तपत्रांच्या पीआर एजंट्सच्या माध्यमातून ही पेड न्यूज 8,50,000 अमेरिकन डॉलर्स देऊन प्रकाशित करण्यात आली. सुकेश चंद्रशेखर यांनी केजरीवाल आणि सत्येंद्र जैन यांच्यासाठी दुबईतून करोडो रुपयांची घड्याळे आणली आणि भेट दिली असा आरोप केला.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com