Ahmedabad Plane Crash : आग, आक्रोश आणि पळापळ ! हॉस्टेलमधून मुलांनी बाल्कनीमधूनच मारल्या उड्या, दुर्घटनेचा भयंकर Video Viral

अहमदाबाद विमान दुर्घटना: विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उड्या मारल्या, व्हिडिओ व्हायरल.
Published by :
Riddhi Vanne

अहमदाबाद एअर इंडिया एअरक्राफ्ट Ahmedabad Air India Aircraft अपघाताशी संबंधित एक नवीन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये बी.जे. मेडिकल कॉलेज B.J. Medical Collgegच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बाल्कनीतून उडी मारून आपला जीव वाचवला.

हे विमान उड्डाणानंतर काही सेकंदाच्या कालावधीतच हॉस्पिटलच्या वसतिगृहात धडकले, ज्यामुळे विमानाला आग लागली. यावेळी बरेच विद्यार्थी वसतिगृहात Hostel उपस्थित होते. आग पाहून, या विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बाल्कनीतून उडी मारण्यास सुरुवात केली. यासंदर्भातील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उड्या मारल्या आहेत. काहींनी कपड्यांचा दोर बनवून त्याद्वारे लटकून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. या घटनेमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. धुरामुळे घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी इमारतीवरून अचानकपणे उड्या मारल्या. यामुळे काही विद्यार्थी जखमी झाले, तर यामध्ये काहींचा मृत्यू जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com