Anurag Thakur
Anurag Thakur Team Lokshahi

शहर स्मार्ट सिटीमध्ये हे ऐकून केंद्रीय मंत्री आश्चर्यचकीत, खराब रस्त्यामुळे आयुक्तांना खडेबोल

स्मार्ट सिटीच्या कामाविषयी व्यक्त केली नाराजी
Published by :
Sagar Pradhan

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे तीन दिवसीय कल्याण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी जाऊन पाहणी केली. मात्र, केडीएमसीत रस्ते खराब रस्ते पाहून त्यांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यावेळी ते म्हणाले की, स्मार्ट सिटीमध्ये हे शहर येते हे ऐकुन मी चकीत झालो असे म्हणत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त करीत आयुक्तांना खडेबोल सुनावित स्मार्ट सिटीच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली.

Anurag Thakur
एकदा शब्द दिला तर मी स्वतःचेही ऐकत नाही, औरंगाबादेत मुख्यमंत्र्यांची तुफान डायलॉगबाजी

याआधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील घाणेरड्या शहराची उपमा दिली होती. परंतु यानंतर आतापर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत या शहराचे किती काम झाले हे अनुराग ठाकूर यांच्या विधानाने समजू शकतो. खराब रस्त्याचा अनुभव कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर मंत्री ठाकूर याना देखील आला आहे.

कल्याण डोंबवली महापालिका क्षेत्रत पावसाळा सुरु झाल्यावर पावसाची अक्षरक्ष: खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. खड्डे बुजविण्याची तयारी महापालिकेने केली होती. गणपती उत्सव संपल्यावरी रस्त्यावरील खड्डे बुजविले गेलेले नाहीत. अनेक ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. वाहन चालक खड्डय़ामुळे त्रस्त आहेत. याचा फटका आत्ता दिल्लीहून कल्याण डोंबिवलीच्या तीन दिवशी दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बसला आहे.

Anurag Thakur
औरंगाबादेत जाऊन शहाजीबापू पाटलांचे खैरेंना आव्हान; म्हणाले, आयुष्यात खासदारकी कधीच नाही

संध्याकाळी अनुराग ठाकूर हे केडीएमसीच्या कार्यालयात आले असता केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे हे केंद्रीय मंत्री ठाकूर, मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, संजय केळकर हे स्मार्ट सिटी कंट्रोल रुममध्ये पोहचले. या दरम्यान केंद्रीय मंत्री ठाकूर यांना स्मार्ट सिटी प्रकल्पांची चित्रफित दाखविली जात होती. त्याच वेळी मंत्री ठाकूर यांनी खडे बोल सुनावले आहे. मला जेव्हा माहित पडले ही कल्याण डोंबिवली हे स्मार्ट सिटी मध्ये आहे हे एकून मला आश्चर्य वाटले. अन्य स्मार्ट सिटी शहरात स्वच्छता, चांगले रस्ते, हॉटी कल्चर, वृक्षारोपण यावर भर दिला आहे. असे विधान मंत्री अनुराग ठाकूर यांनी यावेळी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com