Admin
बातम्या
मविआला धक्का; छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भाजपा-शिंदे गटाच्या ताब्यात
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवला आहे.
या निकालामुळे आता मविआला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारत महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. यात काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे आणि भाजपा आमदार हरिभाऊ बागडे यांची लढत होती.