ताज्या बातम्या
Pune : पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी
पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गृह विभागाकडून नव्या पोलीस ठाण्याला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन गृह विभागाने पुणे शहरात सात नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे.
नवीन पोलीस ठाण्यांतील कामकाजासाठी 816 पोलीस कर्मचारी उपलब्ध करून देण्यात येणार असून आठवडाभरात सर्व 7 पोलीस स्टेशन सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
यासाठी त्यासाठी 60 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही नवीन पोलीस स्टेशन सुरू होणार आहेत.