सायन्सकोर मैदानावरुन बच्चू कडू अन् पोलिसांमध्ये वाद

सायन्सकोर मैदानावरुन बच्चू कडू अन् पोलिसांमध्ये वाद

प्रचारसभेसाठी सायन्सकोर मैदानावरुन नवणीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद सुरू होता.
Published by :
shweta walge
Published on

प्रचारसभेसाठी सायन्सकोर मैदानावरुन नवणीत राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये वाद सुरू होता. त्यातच आज मैदानाची पहाणी करण्यासाठी गेलेल्या बच्चू कडू यांना पोलिसांनी अडवलं, त्यामुळे पोलीस आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बाचाबाची झाली.

नेमकं काय आहे प्रकरण?

सायन्सकोर मैदानावरुन नवनीत राणा आणि बच्चू कडू आमने-सामने आले आहेत. उद्या या मैदानात अमित शाह यांची सभा होणार आहे.

यातच प्रहार पक्षाने दिनेश बूब यांच्या प्रचार सभेसाठी अमरावतीमधील मुख्य भागातील सायन्स कोर मैदान आरक्षित करण्यात आले होते. 23 आणि 24 एप्रिलसाठी प्रहारने हे मैदान आरक्षित केले होते. त्यासाठी रीतसर पैसे भरुन पावती घेतल्याचा दावा प्रहारने केला आहे. पण त्याच ठिकाणी नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठीची जय्यत तयारी पण सुरु करण्यात आल्याने प्रहार संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाच्या दबाबतंत्राचा बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, पोलीस आणि प्रशासन मैदाना सोडण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप कडू यांनी केला. निवडणूक शांतेत पार पडावी अशी आमची इच्छा आहे. पण मैदानासाठी पोलीस आणि प्रशासनाने दबाव टाकल्यास, मैदान मिळाले नाही तर जनआंदोलन करणार असल्याचे, उपोषण करण्याचा इशारा कडू यांनी दिला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com