Arshad Warsi : अर्शद वारसीसह पत्नी मारियावर शेअर मार्केट घोटाळाप्रकरणी एका वर्षासाठी बंदी; SEBI ची कारवाई

Arshad Warsi : अर्शद वारसीसह पत्नी मारियावर शेअर मार्केट घोटाळाप्रकरणी एका वर्षासाठी बंदी; SEBI ची कारवाई

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि त्याचा भाऊ यांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने एका वर्षासाठी शेअर बाजारातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे.
Published by :
Rashmi Mane
Published on

बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसी, त्याची पत्नी मारिया गोरेट्टी आणि त्याचा भाऊ यांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने एका वर्षासाठी शेअर बाजारातून बाहेर पडण्यास मनाई केली आहे. साधना ब्रॉडकास्ट लिमिटेड (आता क्रिस्टल बिझनेस सिस्टम लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) शी संबंधीत स्टॉक मॅनिपुलेशन प्रकरणात सेबीनं ही कारवाई केली आहे.

साधना ब्रॉडकास्टच्या शेअर्सची किंमत कृत्रिमरित्या वाढवण्याच्या आणि नंतर त्यांना संशयास्पद किरकोळ गुंतवणूकदारांना विकण्याच्या योजनेचा हा समूह भाग होता, असे सेबीने म्हटले आहे. बंदीसह सेबीने त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये दंड भरण्याचे आणि एकूण 1.05 कोटी रुपयांचे बेकायदेशीर नफा परत करण्याचे आदेशही दिले आहेत.

सेबीच्या म्हणण्यानुसार, अर्शद वारसी आणि इतरांनी मनीष मिश्रासोबत काम केले. ज्याने कंपनीभोवती खोटी चर्चा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मिश्रा गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी दिशाभूल करणारे YouTube व्हिडिओ आणि पेड कॅम्पेन वापरत असे. सेबीला मिश्रा आणि वारसी यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट्स आढळले. ज्यावरून असे सूचित होते की मिश्राने अर्शद वारसी, त्याची पत्नी आणि त्याच्या भावाच्या बँक खात्यात प्रत्येकी २५ लाख रुपये ट्रान्सफर करण्याची ऑफर दिली होती.

वारसींनी दावा केला की, ते स्टॉक ट्रेडिंगमध्ये नवीन आहेत आणि त्यांना जोखमींची माहिती नाही. सेबीने निदर्शनास आणून दिले की, अर्शद वारसी केवळ त्याच्या स्वतःच्या खात्यातूनच नव्हे तर त्याच्या पत्नी आणि भावाच्या खात्यांमधून देखील ट्रेडिंग करत होता. त्याचे म्हणणे 27 जून 2023 रोजी नोंदवण्यात आले.

एकूण, सेबीने सात जणांना पाच वर्षांसाठी आणि आणखी 54 जणांना एका वर्षासाठी व्यापार करण्यास बंदी घातली आहे. सेबीने म्हटले आहे की, स्टॉक फेरफार ही "पंप अँड डंप" योजना होती. साधना ब्रॉडकास्टच्या शेअरची किंमत खोटी माहिती वापरून वाढवण्यात आली आणि नंतर किंमत जास्त असताना मोठ्या प्रमाणात शेअर्स विकण्यात आले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com