काँग्रेसला मिळालेल्या विजयामागे आमचा 'हात' - मुख्यमंत्री केजरीवाल
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता आम आदमी पार्टीचे प्रमुख नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले, काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मोफत वीज, मोफत रेशन आणि बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन देऊन कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले.
तसेच ते म्हणाले की, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून कर्नाटकच्या जनतेला दिलेली आश्वासने ही सर्व ‘आप’चीच मूळ कल्पना होती. काँग्रेसच्या विजयामागे आम आदमी पक्षाचा मोठा हात असल्याचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.