Arvind Kejriwal यांच्या हत्येचा कट, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्याआधी दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर, दिल्लीच्या मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्या आतिशी यांनी एका वृत्तपत्र संवादात दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिसांनी केजरीवाल यांच्या हत्येच्या कटात सहभागी होऊन भाजपाच्या मदतीने त्यांना लक्ष्य केले आहे.
भाजप आणि दिल्ली पोलिसांवर आतिशी यांचा आरोप
आतिशी यांनी शुक्रवारी दिल्ली पोलिसांवर आरोप करतांना म्हटले की, “अरविंद केजरीवाल यांच्या हत्येच्या कटात भाजपा आणि दिल्ली पोलिसांचा समावेश असल्याचं त्या म्हणाल्या. दोघेही मिळून केजरीवाल यांना संपवण्याचा कट करत आहेत.” त्याच वेळी त्यांनी मागील काही महिने घडलेल्या हल्ल्यांचे उदाहरण दिले.
आतिशी म्हणाल्या, "ऑक्टोबर २०२४ मध्ये केजरीवाल यांच्यावर दिल्ली पोलिसांसमोर हल्ला झाला. त्यानंतर नोव्हेंबर ३० रोजी मालविय नगरमध्ये हल्ला करण्यात आला. याच्या मदतीने त्यांनी केजरीवाल यांना सार्वजनिक कार्यक्रमात मारहाण करण्याचा प्रयत्न केला." त्यानंतर, जानेवारी १८ रोजी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात त्यांच्यावर हल्ला झाला आणि यावेळी देखील आरोपी भाजपाशी संबंधित असल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे.
आतिशी यांनी दिल्ली पोलिसांवर आरोप केले की, त्यांनी हे सर्व हल्ले थांबवण्यासाठी कोणतीही कारवाई केली नाही. "दिल्ली पोलिसांचा भाजपाशी जवळचा संबंध आहे आणि त्यांनी कधीच आरोपींविरोधात योग्य कारवाई केली नाही. आम्हाला आता दिल्ली पोलिसांवर विश्वास नाही, कारण ते अमित शाह यांच्या नियंत्रणाखाली आहेत" असेही आतिशी म्हणाल्या. आतिशी यांच्या या आरोपामुळे दिल्ली पोलिसांच्या भूमिकेविषयी नवे प्रश्न उपस्थित झाले आहे.