'आप'महाराष्ट्र विधानसभा स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांचा तिसरा उमेदवार जाहीर

'आप'महाराष्ट्र विधानसभा स्वबळावर लढणार; अरविंद केजरीवालांचा तिसरा उमेदवार जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि राज्यातील इतर पक्ष जोरदार तयारीला
Published by :
shweta walge
Published on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि राज्यातील इतर पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठी आम आदमी पक्षाचा तिसरा उमेदवार जाहीर केला आहे. आपकडून परभणीत सतीश चकोर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीये.

मराठवाड्यातील बीड, लातूर पाठोपाठ परभणीतही विधानसभेचा उमेदवार आम आदमी पार्टीच्या राज्य संघटकांकडून जाहीर करण्यात आलाय. परभणीत पत्रकार परिषद घेऊन आम आदमी पार्टीचे राज्य संघटक संग्राम पाटील यांनी सतीश चकोर यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे देशात जरी आम आदमी पार्टी इंडिया अलायन्स बरोबर असली तरी महाराष्ट्रात मात्र ते विधानसभेच्या 288 जागा स्वतंत्र लढणार हे स्पष्ट झालंय.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही आम आदमी पक्ष इंडिया आघाडीचा भाग होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून एकही जागा न लढवता महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. याचबरोबर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मुंबईत येऊन प्रचारही केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com