ताज्या बातम्या
'निष्ठावंतांना आदेशाची गरज नाही", अरविंद सावंत यांचा टोला नक्की कोणाला?
अरविंद सावंत यांनी माध्यमांशी साधला निशाणा.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणात उलथापालथ झालेली बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे उपनेते राजन साळवी यांनी 12 फेब्रुवारीला राजीनामा दिला. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजन साळवी यांचा पक्षप्रवेश करणार आहेत. याबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची मतं मांडली आहेत.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी काही काळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेतल्याचे सांगितले. निष्ठावंतांना आदेशाची गरज नसते असे ते म्हणाले. मात्र त्यांनी हा निशाणा नक्की कोणावर साधला आहे? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.