ताज्या बातम्या
Sanjay Raut on Thackeray Brother : योग्य वेळी पडदा उघडणार, ठाकरेबंधूच्या युतीवर राऊतांचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार? संजय राऊतांचं वक्तव्य, योग्य वेळी पडदा उघडणार
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेचा निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे सर्वपक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत. मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा चर्चा काही दिवसांपासून रंगत आहेत.
मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत पुढे काही चर्चा सरकत नसताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठ विधान केले आहे. यामध्ये चर्चा काय आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. पडदा उघडायला वेळ आहे, तो योग्य वेळ आली की, उघडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्याकडून सकारात्मक भूमिका आहे. महाराष्ट्रामधील जनतेच्या मनात भावना असेल तर हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही अशी उध्दव ठाकरे यांची भूमिका आहे, असं राऊतांची म्हटले आहे.