ताज्या बातम्या
Ladki Bahin Scam : लाडक्या भावांनी वर्षभर लाटले पैसे; सरकारला 24 कोटींचा भुर्दंड
लाडकी बहीण योजनेत गेल्या वर्षभरापासून तब्बल 12 हजार 431 पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे.
लाडकी बहीण योजनेत गेल्या वर्षभरापासून तब्बल 12 हजार 431 पुरूष लाभार्थी या योजनेचा गैरमार्गाने लाभ घेत होते असं स्पष्ट झालं आहे. राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 12 हजार 431 पुरुष लाभार्थ्यांना योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीतून हटवण्यात आलं आहे.
त्याचसोबत एकूण 77 हजार 980 अपात्र महिला लाभार्थ्यांनाही यादीतून हटवलं आहे. विशेष म्हणजे वर्षभर दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये या अपात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होत होते. यातून सरकारी तिजोरीला पुरुष लाभार्थ्यांसाठी 24.24 कोटी तर अपात्र महिला लाभार्थ्यांमुळे 140.28 कोटींचा भुर्दंड बसला आहे.