पुणे शहरात तब्बल 27 ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटना

पुणे शहरात तब्बल 27 ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आगीच्या घटना

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात तब्बल 27 ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
Published by  :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुणे शहरात तब्बल 27 ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. बारा तासात 27 घटनांच्या नोंदी झाल्या आहेत.

यात सुदैवाने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याची माहिती नाही आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अग्निशामक दलाकडून विविध ठिकाणी आग आटोक्यात आणण्यात आली.लक्ष्मीपूजन

आगीच्या घटना

१) वेळ राञी ०७•३८ - रास्ता पेठ, के ई एम हॉस्पिटल जवळ एका इमारतीत टेरेसवर आग

२) वेळ राञी ०७•४० - कोथरुड, सुतार दवाखान्या जवळ दुकानामध्ये आग

३) वेळ राञी ०८•१८ - वडारवाडी, पांडवनगर पोलिस चौकीजवळ घरामध्ये आग

४) वेळ राञी ०८•२४ - कोंढवा बुद्रुक पोलिस चौकीसमोर कचरयाला आग

५) वेळ राञी ०८•५० - नाना पेठ, चाचा हलवाई जवळ इमारतीत दहाव्या मजल्यावर घरामध्ये आग

६) वेळ राञी ०८•५२ - घोरपडी पेठ, आपला मारुती मंदिराजवळ झाडाला आग

७) वेळ राञी ०८•५७ - कोंढवा, शिवनेरी नगर येथे इमारतीत टेरेसवर आग

०८) वेळ राञी ०८•५८ - वारजे, आदित्य गार्डन, फ्लोरा सोसायटीत घरामध्ये आग

०९) वेळ राञी ०९•०० - शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर वाड्यामध्ये आग

१०) वेळ राञी ०९•१३ - केशवनगर-मुंढवा रस्ता, गुडविल सोसायटीत घरामध्ये आग

११) वेळ राञी ०९•२७ - आंबेगाव पठार, चिंतामणी शाळा येथे भंगार दुकानामध्ये आग

१२) वेळ राञी ०९•३१ - शुक्रवार पेठ पोलिस चौकीसमोर तिसरया मजल्यावर आग

१३) वेळ राञी ०९•३२ - गुरुवार पेठ, कृष्णाहट्टी चौक येथे दुकानामध्ये आग

१४) वेळ राञी ०९•५० - हडपसर, रासकर चौक येथे एका घरामध्ये आग

१५) वेळ राञी ०९•५१ - पिसोळी, खडी मशीन चौक येथे अदविका फेज १ येथे घराच्या गॅलरीमध्ये आग

१६) वेळ राञी १०•०८ - रास्ता पेठ, आगरकर शाळेजवळ छतावर कागदाला आग

१७) वेळ राञी १०•०९ - लोहगाव, शिवनगर, वडगाव शिंदे रोड इमारतीत गॅलरीमध्ये आग

१८) वेळ राञी १०•२३ - विश्रांतवाडी, सिरीन हॉस्पिटल जवळ इमारतीत गॅलरीत आग

१९) वेळ राञी १०•२८ - वडारवाडी, पांडव नगर येथे घरामध्ये आग

२०) वेळ राञी १०•३४ - धानोरी, विठ्ठल मंदिर येथे गवताला आग

२१) वेळ राञी १०•४३ - गुरुवार पेठ, मामलेदार कचेरी जवळ घरामध्ये आग

२२) वेळ राञी १०•५२ - बी टी कवडे रोड, सोलेस पार्कसमोर घरामध्ये आग

२३) कोंढवा, शिवनेरी नगर, ब्रम्हा एवेन्यू सोसायटी येथे गच्चीवर टॉवरला आग

रात्री १२ नंतर

२४) वेळ राञी १२•३८ - गुरुवार पेठ, गोरी आळी येथे वाड्यामध्ये आग

२५) वेळ राञी १२•५० - रास्ता पेठ, अपोलो थिएटर जवळ इमारतीत बाल्कनीमध्ये आग

२६) वेळ राञी ०२•०६ - औंध, आंबेडकर चौक येथे कचरयाला आग

२७) वेळ राञी ०३•१४ - बुधवार पेठ, तपकीर गल्ली दुकानामध्ये आग

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com