कुत्र भुंकलं म्हणून माजी अधिकाऱ्याने डायरेक्ट कुत्र्यावर झाडल्या गोळ्या

कुत्र भुंकलं म्हणून माजी अधिकाऱ्याने डायरेक्ट कुत्र्यावर झाडल्या गोळ्या

कोणाला कशाचा राग येईल काय सांगता येणार नाही आणि या रागात तो माणून कोणतं पाऊल उचलेल हे देखिल सांगता येणार नाही अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

कोणाला कशाचा राग येईल काय सांगता येणार नाही आणि या रागात तो माणून कोणतं पाऊल उचलेल हे देखिल सांगता येणार नाही अशीच एक घटना बीडमध्ये घडली आहे. शेजारच्याचं कुत्र भुंकल म्हणून माजी अधिकाऱ्याने रागाच्या भरात कुत्र्यावर थेट गोळ्या झाडल्या आहेत. घरातील पिस्तुल घेऊन हा अधिकारी थेट हॉटेलजवळ गेला. हॉटेलच्या पार्किंग मध्ये त्याने कुत्र्याचा पाठलाग केला. यानंतर या अधिकाऱ्याने आपल्या जवळच्या पिस्तुलमधून कुत्र्यावर गोळ्या झाडल्या. बंदुकीची गोळी लागून कुत्रा जागेवर ठार झाला.

हा व्यक्ती माजी कृषी अधिकारी असल्याचे समजते. या अधिकाऱ्या घरासमोरच एक हॉटेल आहे. या हॉटेल मालकाचा कुत्रा मोठ्याने भुंकत होता. कुत्र्याचे भुंकने ऐकून हा अधिकारी चिडला आणि त्याने हे कृत्य केले. कुत्र्याच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या हॉटेल मालकाने या अधिकाऱ्याला याबाबत जाब विचारला. मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो असे उत्तर अधिकाऱ्याने दिले.

परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात हॉटेल मालकाने तक्रार केली. त्यानुसार या माजी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com