Nashik Pregnancy
Nashik Pregnancy

आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार; रुग्णालयात डॉक्टर-नर्स सुट्टीवर, आईनं केली प्रसूती

एकीकडे डिजिटल इंडियाचे कॅम्पेन केलं जात असताान दुसरीकडे शेतकरी, सामान्य वर्ग आजही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बळी ठरत आहे.

विकास काजळे : इगतपुरी | शेतकरी, सामान्य वर्ग आजही प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा बळी ठरताना दिसतोय. त्यातच आता नाशिक (Nashik) जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्र्यंबकेश्वर (Trimabkeshwar) तालुक्यातील अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Anjaneri Primary Health Center) प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेची डॉक्टर नसल्यानं स्वतःच्या आईनेच प्रसूती केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी (Anjneri) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा भोंगळ कारभार समोर आलाय.

Nashik Pregnancy
आमदार धीरज देशमुखांचा बेळगावात जय बेळगाव, जय कर्नाटकचा नारा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे जवळील बरड्याचीवाडी येथील एक महिला डिलिव्हरीसाठी अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. मात्र आरोग्य केंद्रात एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नसल्यानं आईलाच मुलीची प्रसूती करावी लागल्याची बाब उघडकीस आलीय.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आव्हाटे गावाजवळ बरड्याचीवाडी आहे. येथील यशोदा त्र्यंबक आव्हाटे या गर्भवती महिलेस प्रसूती कळा जाणवल्यानं रविवारी सकाळीच आई सोनाबाई आव्हाटे यांच्यासोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. मात्र आरोग्य केंद्रात दाखल झाल्यानंतर या ठिकाणी एकही आरोग्य अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते.

यावेळी प्रसूती वेदना वाढत असल्यानं सोबत असलेल्या आई आणि आशा वर्करनं प्रसूती करण्याचं ठरवलं. त्यानुसार त्या विवाहित महिलेच्या आईनं स्वतः बाळाचा जीव धोक्यात घालून प्रसूती केली. विवाहितेच्या आईनं कशीबशी तरी प्रसूती केल्याची माहिती मिळतेय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com