काँग्रेसने बडतर्फ केल्यानंतर आशिष देशमुख यांनी सांगितले पुढची राजकीय भूमिका काय? म्हणाले...
Admin

काँग्रेसने बडतर्फ केल्यानंतर आशिष देशमुख यांनी सांगितले पुढची राजकीय भूमिका काय? म्हणाले...

आशिष देशमुख यांना कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

आशिष देशमुख यांना कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. सहा वर्षांसाठी देशमुखांना पक्षातून निलंबित केलं आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजीच्या पाठविलेल्या कारणे दाखवा नोटीसला ९ एप्रिल २०२३ रोजीच्या आपल्यामार्फत मिळालेल्या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. आपण आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात. आशिष देशमुख यांनी काँग्रेस नेते आणि माजी खासदार राहुल गांधी, तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात वक्तव्य केले होते.

यावर आता आशिष देशमुख यांनी त्यांची पुढची भूमिका काय असणार आहे ते सांगितले आहे. आशिष देशमुख म्हणाले की, जनतेचा कौल पाहून मी पुढचा निर्णय घेईन. मी जनतेशी बोलून माझी राजकीय भूमिका ठरवेन. मला काँग्रेसमधून काढून टाकलं जाईल अशी अपेक्षा नव्हती. २०१९ मध्ये मी देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात त्यांना झुंज दिली. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com