Ashish Shelar : आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले...

Ashish Shelar : आशिष शेलार यांची आदित्य ठाकरेंवर टीका; म्हणाले...

आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर ट्विट करत टीका केली आहे. आशिष शेलार म्हणाले की, ज्यांचे विधानसभेत कधी ही एखादे भाषण गाजले नाही, ज्यांचा मंत्री म्हणून एखादा निर्णय दूरगामी ठरला नाही, ज्यांनी मुंबईच्या रस्त्यावरचे धड कधी खड्डे भरले नाहीत, ज्यांची बातमी हल्ली सामना पण पहिल्या पानावर छापत नाही.

असे श्रीमान आदित्य ठाकरे हल्ली बांगलादेशी घुसखोरीवर वारंवार आपल्या "अफाट ज्ञान सौंदर्याचे" प्रदर्शन करीत आहेत, म्हणून आम्ही त्यांना सांगतो आहोत.

भाजपाची सत्ता असलेल्या आसाम, त्रिपुरा मधून घुसखोरी होत नाही, ममता दिदी बांगलादेशी घुसखोरीचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठराखण करीत आहेत. ममता बॅनर्जी सीमा सुरक्षा दल पश्चिम बंगाल मध्ये तैनात करु देत नाहीत.

आदित्य ठाकरे यांना याचे पुर्ण ज्ञान आहे.. पण जर बोलता येत नाही, असे असेल तर...आदित्य ठाकरे यांनी आपल्या वडिलांची "लाडकी दिदी" योजना धुडकावून...

प्रथम देश.. नंतर उरलासुरला पक्ष आणि शेवटी माझे कुटुंब माझी जबाबदारी...!अशी डरकाळी देशासाठी एकदा फोडावी ! मग सामनाचे सोडा हो.. देशभरातील मिडियात तुमची हेडलाईन होईल. असे आशिष शेलार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com