Ashish Shelar
Ashish Shelar Team Lokshahi

ही तर दुर्बळांची भयभीत सभा; ‘वज्रमूठ’ सभेवरून आशिष शेलारांची टीका

शिवाजी पार्कसारखं मोठं मैदान न घेता छोट्या मैदानात वज्रमूठ सभेचं आयोजन केल्यावरून आशिष शेलारांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिवाजी पार्कसारखं मोठं मैदान न घेता छोट्या मैदानात वज्रमूठ सभेचं आयोजन केल्यावरून आशिष शेलारांनी महाविकास आघाडीला टोला लगावला होता. आशिष शेलारांच्या या वक्तव्याचा वज्रमूठ सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. अरे आशिष शेलार तुझे डोळे चिनी आहेत. इथे येऊन ही गर्दी बघ, कळेल तुला, असा जोरदार टोला राऊतांनी शेलारांनी लगावला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेते आशिष शेलार यांची टीका केली आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, आमचे केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भीतीने तीन पक्ष एकत्र आलेत, त्याला हे वज्रमूठ वगैरे म्हणतात...

तसेच ही दुर्बळांची भयभीत सभा आहे. तिघे एकत्र आले तरी अजूनही भय संपले नाही. गोळाबेरीज सुरूच आहे. दुसरं कारण मुंबई महापालिकेत केलेल्या भ्रष्टाचाराची जंत्री भविष्यात उघड होणार म्हणून अगोदरच झोळी पसरून सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे यांची वज्रमूठ! असे म्हणत शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com